Advertisement

मुंबईतील पार्किंगची सोडवणार 'पार्किंग अॅथाॅरिटी'

पार्किंग स्थळाच्या परिसरातील मॅपिंग आणि वाहनांच्या वर्दळीचं सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. २४ वाॅर्डातील सर्वेक्षण अहवाल तयार झाल्यानंतर शहर-उपनगरातील पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना तयार करण्यात येतील.

मुंबईतील पार्किंगची सोडवणार 'पार्किंग अॅथाॅरिटी'
SHARES

मुंबईत कार-बाइक पार्क करणं ही वाहनचालकांपुढील सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येपासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी मुंबई महापालिकेने पार्किंग अॅथाॅरिटी (वाहनतळ प्राधिकरण) बनवण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. याकरीता महापालिकेने एक पॅनल तयार केलं आहे. हे पॅनल महापालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व २४ वाॅर्डांतील पार्किंगसाठी आराखडा तयार करेल. या पॅनलमध्ये नगरनियोजन तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.

तज्ज्ञांकडून सर्वेक्षण

हे तज्ज्ञ संबंधित वाॅर्ड अधिकाऱ्यांसोबत आॅन स्ट्रीट आणि आॅफ स्ट्रीट सार्वजनिक पार्किंगसंदर्भातील डेटाबेस गोळा करण्याचं काम करतील. या कामाला पुढील महिन्यात प्रत्यक्षात सुरूवात होईल. या सर्व पार्किंगचं मॅपिंग झाल्यानंतर तज्ज्ञ या पार्किंग परिसरातील वाहनांच्या वर्दळीचं सर्वेक्षण करतील.

महिन्याभरात सर्वेक्षण

पार्किंग स्थळाच्या परिसरातील मॅपिंग आणि वाहनांच्या वर्दळीचं सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. २४ वाॅर्डातील सर्वेक्षण अहवाल तयार झाल्यानंतर शहर-उपनगरातील पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना तयार करण्यात येतील.

निधीची तरतूद

नव्या विकास आराखड्या (डीपी २०३४)नुसार मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पार्किंग प्राधिकरण बनवण्यासंदर्भात नमूद करण्यात आलं आहे. महापालिकेच्या २०१८-१९ अर्थसंकल्पातही या प्राधिकरणासाठी तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा-

एमयूटीपी ३-अ ला राज्य शासनाचा हिरवा कंदील

सीएसटीएम येथील हेरीटेज गॅलरीचा होणार विस्तार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा