Advertisement

एमयूटीपी ३-अ ला राज्य शासनाचा हिरवा कंदील

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ मधील सर्व प्रकल्प रेल्वेचे असून या प्रकल्पातून होणारा नफ्याचा फायदा रेल्वेला होणार आहे. त्याचप्रमाणं, या प्रकल्पातील ५० टक्के म्हणजे २७ हजार ३८९ कोटी रुपयांचा खर्च उचलण्याकरीता राज्य शासन तयार आहे.

एमयूटीपी ३-अ ला राज्य शासनाचा हिरवा कंदील
SHARES

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) कार्यान्वीत केले जातात. या सर्व प्रकल्पांना राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय आणि जागतिक बँकेचे अर्थसाह्य आहे. या प्रकल्पांमधील मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ (एमयूटीपी ३ अ) च्या ५४ हजार ७७७ कोटी रुपयांच्या आराखड्यास महाराष्ट्र शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.  तसंच या प्रकल्पातील ५० टक्के वाटा म्हणजे २७ हजार ३८९ कोटी रुपये उचलण्यास महाराष्ट्र शासनाने समंती दिली आहे. दरम्यान, हा प्रस्ताव आता रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाणार आहे. 


महाराष्ट्र शासन भार उचलणार

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ मधील सर्व प्रकल्प रेल्वेचे असून या प्रकल्पातून होणारा नफ्याचा फायदा रेल्वेला होणार आहे. त्याचप्रमाणं, या प्रकल्पातील ५० टक्के म्हणजे २७ हजार ३८९ कोटी रुपयांचा खर्च उचलण्याकरीता राज्य शासन तयार आहे.

यातील महाराष्ट्र शासन १२ हजार ५६७ कोटींचाच वाटा उचलणार असून रेल्वेला ७ हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून कर्ज स्वरुपात घ्यावे लागणार आहेत. तर बाकीच्या खर्चाचा भार हा एमएमआरडीए ३६३५.३० कोटी, सिडको १७९४.३० कोटी, मुंबई महापालिका १७९४.३० कोटी, नवी मुंबई महापालिका ५९८.१० कोटी यांच्यावर टाकण्यात आला आहे.


कामांना लागणारा निधी

 'एमयूटीपी-३ अ' अंतगर्त २१० एसी लोकलकरीता १७ हजार ३७४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल उन्नत जलद मार्गाकरीता १२ हजार १३१ कोटी, गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गाच्या विस्ताराकरीता ८२६ कोटी, पनवेल-विरार कॉरिडोरकरीता ७०८९ कोटी, बोरिवली-विरार पाचव्या व सहाव्या मार्गिकेकरीता २१८४ कोटी, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिकेकरीता १७५९ कोटी,  कल्याण यार्ड आधुनिकीकरणासाठी ९६१ कोटी, सीबीटीसी सिग्नल यंत्रणाकरीता ५८२८ कोटी, स्थानक विकासकरीता ९४७ कोटी, २१० एसी लोकलकरीता १७ हजार ३७४ कोटी, गाड्यांच्या देखभाल सुविधेकरीता २३५३ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. 



हेही वाचा - 

रेल्वेची एटीव्हएम, मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन कुचकामी

मालाड स्कायवाॅक सोमवारपासून ११ दिवसांसाठी बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा