Advertisement

पावसाळी आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी महापालिका घेणार वॉर रूमची मदत

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावसाळी आजाराची समस्या असल्यास वॉर रूमला कळविण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पावसाळी आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी महापालिका घेणार वॉर रूमची मदत
SHARES

गेल्या वर्षभरापासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, मुंबईतही अनेकांना कोरोनाची लागण झाली. राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. शिवाय, पावसाळा सुरू असल्यानं साथीच्या आजारांचा धोकाही वर्तवला जात आहे. त्यामुळं महापालिका तयारीला लागली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावसाळी आजाराची समस्या असल्यास वॉर रूमला कळविण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सध्या पावसाळा सुरू असून पावसाळी आजारांपैकी ताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आदी कोणतीही तक्रार असल्यास वॉर रूमशी संपर्क करावयाचा आहे. याची नोंद वॉर रूम घेणार असून वॉर रूम त्या प्रभागातील आरोग्य विभागाशी संपर्क करणार आहे. पुढील उपाययोजना करण्यास हा प्रभाग त्या त्या संबंधित विभागाशी आदेश होणार आहेत. कोरोना काळात स्थापन केलेले वॉर रूम हे बहुउद्देशीय असून या रूमचा वापर इतर आजारांसाठी होणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपर्यंत मलेरियाचे १९९१, लेप्टोचे ७४, डेंग्यूचे ५७, गॅस्ट्रोचे १३८४, हिपॅटायटिसचे ९५, तर एच१एन१ आजाराचे १९ अशा रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात मलेरिया आणि गॅस्ट्रो आजाराचे रुग्ण सर्वाधिक आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा