Advertisement

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांची भूक होतेय कमी

मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या वाढत असली, तरी खड्डयांची भूक मात्र कमी होताना दिसत आहे. कारण वर्षांपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी जिथे २५ हजार मेट्रीक टन डांबराचा वापर करण्यात येत होता, तिथं आता १० हजार मेट्रीक टन डांबराचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांची भूक होतेय कमी
SHARES

पावसाळा आला की मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचणार हे जसं ठरलेलं आहे, तसंच या पावसाळ्यात खड्डे पडणार हेही ठरलेलंच आहे. त्यामुळे 'नेमची येतो पावसाळा' तसंच 'नेमेची पडतात रस्त्यांवर' खड्डे हे ठरलेलेच आहेत. त्यामुळे, दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या वाढत असली, तरी खड्डयांची भूक मात्र कमी होताना दिसत आहे. कारण वर्षांपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी जिथे २५ हजार मेट्रीक टन डांबराचा वापर करण्यात येत होता, तिथं आता १० हजार मेट्रीक टन डांबराचा वापर करण्यात येणार आहे.


वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर महापालिकेकडून करण्यात येता. कधी कोल्ड मिक्स तर कधी हॉटमिक्स तर कधी कार्बनकोर तंत्रज्ञानाचा समावेश आहे. मात्र, गेल्या ३ ते ४ वर्षांचा आढावा घेता यंदा खड्डयांसाठी लागणारा खडीमिश्रित डांबर कमी प्रमाणात लागणार आहे. मुंबई यासाठी कोल्डमिक्सची यंत्रणा महापालिकेच्या वरळी येथील असफाल्ट प्लांटमध्ये तयार केली जात आहे.


रस्त्यांची यादी तयार

मुंबईमध्ये वारंवार पडणाऱ्या खड्डयांची समस्या लक्षात घेता महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिखराब, खराब तसेच त्याखालोखाल असणाऱ्या रस्त्यांची यादी प्राधान्य क्रमांक एक, दोन तसेच तीन यानुसार तयार करून रस्त्यांची कामे हाती घेतली आहे.



साहित्यामध्ये घट

त्याचा परिणाम सध्या मुंबईच्या रस्त्यांवर दिसत आहे. महापालिकेने सन २०१५-१६ मध्ये २५ हजार १३० मेट्रीक टन एवढे मटेरियल्स खड्डे बुजवण्यासाठी वापरले होते. त्यानंतरच्या वर्षांत खड्डे बुजवण्यासाठी २९ हजार ६३६ मेट्रीक टन एवढे मटेरियल्स वापरले होते. मात्र, मागील वर्षी हे प्रमाण १३ हजार मेट्रीक टनावर आले असून यंदा १० हजार मेट्रीक टन एवढं मटेरियल्स वापरलं जाणार आहे. त्यामुळे ४ वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतली, तर खड्डे बुजवण्यासाठी लागणाऱ्या मटेरियल्सच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.  


किती पुरवठा?

यंदा पावसाळयात रस्त्यांवर निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका सर्तक असून त्यासाठी कंत्राटदारांचीही नेमणूक केली आहे. यंदा यासाठी १० हजार मेट्रीक टन मटेरियल्सचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये ७ हजार ५०० मेट्रीक टन कंत्राटारांकडून पुरवठा केला जाणार असून २५०० मेट्रीक टन मटेरियल्स हे


कोल्डमिक्सचा वापर

मागील काही वर्षांपासून रस्ते विभागाने हाती घेतलेली कामे आणि कंत्राटदारांच्या हमी कालावधीतील काही रस्ते असल्याने खड्डयांचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र, जे कालावधीत हमी रस्ते नाहीत, अशा रस्त्यांवर पडलेले खड्डे कंत्राटदारांच्या माध्यमातून माध्यमातून भरले जाणार आहेत. मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान उद्भवणारे खड्डे चांगल्याप्रकारे भरता यावेत, यासाठी 'कोल्डमिक्स' हे अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेलं मिश्रण वापरण्यास गेल्यावर्षीपासून प्रायोगिक स्तरावर सुरुवात झाली होती.


सकारात्मक परिणाम

गेल्या पावसाळ्यात या मिश्रण वापराचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने यावर्षी हे मिश्रण महापालिकेने आपल्याच कारखान्यात तयार करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता 'कोल्डमिक्स'चं उत्पादन महापालिकेच्या वरळी येथील 'अस्फाल्ट प्लान्ट' मध्येच करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच या वर्षी देखील 'कोल्डमिक्स'च्या चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. तसंच या मिश्रणाने खड्डा भरण्याचं काम जुन्या पद्धतीच्या तुलनेत कमी वेळेत होत असल्याने याविषयीच्या प्रशिक्षणास कर्मचारी चांगला प्रतिसाद देत आहेत, अशीही माहिती विनोद चिठोरे यांनी दिली आहे.



हेही वाचा-

महापालिका आयुक्तांनी मारलेला शेराच बदलला

महापालिकेच्या रुग्णालयांवर अग्निशमन दलाचाच विश्वास नाही!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा