Advertisement

प्लास्टिक बंदीसाठी महापालिका बाप्पाच्या दरबारी

प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीसाठी चक्क गणरायांना महापालिका साकडे घालणार असून बाप्पांच्या दरबारातच या बंदीबाबत लोकांचं मतपरिवर्तन केलं जाणार आहे. गणेशोत्सवात प्रत्येक मंडळांच्या माध्यमातून भक्तांना प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरण्याचं आवाहनच केलं जाणार आहे.

प्लास्टिक बंदीसाठी महापालिका बाप्पाच्या दरबारी
SHARES

संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलवरील बंदी जाहीर करण्यात आल्यानंतर मुंबईत याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र तरीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद होऊ शकला नाही. त्यामुळे या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीसाठी चक्क गणरायांना महापालिका साकडे घालणार असून बाप्पांच्या दरबारातच या बंदीबाबत लोकांचं मतपरिवर्तन केलं जाणार आहे.

गणेशोत्सवात प्रत्येक मंडळांच्या माध्यमातून भक्तांना प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरण्याचं आवाहनच केलं जाणार आहे.


प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

२३ जूनपासून राज्यात प्लास्टिक प्लॅस्टिकबंदीची अंमलमजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून मुंबईत प्लास्टिक पिशव्यांविरोधात धडक कारवाई हाती घेण्यात आली. मात्र, तरीदेखील काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचं दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर कारवाईबरोबरच जनजागृती करण्यावर पालिकेकडून भर दिला जाणार आहे.


अनेक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या लाखो भक्तांना प्लास्टिक पिशव्यांचे दुष्परिणाम ‘दृक-श्राव्य’ माध्यमातून पटवून देण्यात येतील. यासाठी पालिकेकडून मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांना उपायुक्त निधी चौधरी यांनी पत्र पाठवून प्लास्टिक पिशव्यांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाच्या पत्रांना अनेक मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून याबाबत कार्यवाही देखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील जास्तीत जास्त मंडळांनी पालिकेकडे संपर्क साधून प्लास्टिकविरोधात जनजागृती करावी, असं आवाहनही पालिकेने केलं आहे.


जनजागृती करणे गरजेचं

पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करायचं असेल तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करणे गरजेचं आहे. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भक्तगण एकत्र येत असल्यानं मंडळांनी प्लास्टिकविरोधी जनजागृती केली पाहिजे, असं उपायुक्त विशेष निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.


भक्तांना पटवून देणार महत्त्व

  • पालिकेकडून मंडळांना देण्यात येणार ‘सीडी’
  • सीडीत प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर टाकण्यात आलाय प्रकाश
  • फलक, घोषवाक्य, व्हिडि द्वारे दाखवले पर्यावरणावरील दुष्परिणाम
  • प्लास्टिकचे पर्यायांचा दाखवला मार्ग

हेही वाचा -

प्लास्टिक बंदीसाठी महापालिका बाप्पाच्या दरबारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा