Advertisement

विद्यार्थी म्हणतात, 'आम्हाला हवंय प्लास्टिकपासून स्वातंत्र्य!'


विद्यार्थी म्हणतात, 'आम्हाला हवंय प्लास्टिकपासून स्वातंत्र्य!'
SHARES

येत्या १५ ऑगस्टला देशात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्लास्टिक बंदी केल्यानंतरही प्लास्टिकचा होणारा वापर आणि त्याचे संभाव्य धोका टाळण्यासाठी 'प्लास्टिकपासून स्वातंत्र्य' या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन सायनच्या डी.एस. हायस्कूलनं केलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच प्रदर्शन भरवलं होतं.

IMG-20180812-WA0010.jpg

रविवारी १२ ऑगस्टला झालेल्या कार्यक्रमात डी.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जुन्या खराब झालेल्या सीडीपासून वॉल हँगिंग, आईस्क्रिम स्टिक्सपासून कॉफी मग होल्डर किंवा पेन स्टँड, वर्तमानपत्रापासून हलकं सामान ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी बॅगा किंवा बास्केट्स यांसारख्या विविध शोभिवंत वस्तू बनवल्या होत्या. तसंच यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी 'आम्हाला प्लास्टिकपासून स्वातंत्र्य हवंय' असं म्हणत पर्यावरण संरक्षणाची शपथही घेतली.

IMG-20180812-WA0013.jpg

या कार्यक्रमाच्या निमित्तानं डी. एस. हायस्कूलच्या ‘अंकुर निसर्ग मंडळा’च्या वंदना म्हात्रे यांनी कच-यापासून शोभिवंत वस्तू कशा बनवाव्या, कोणत्या प्लास्टिकचा वापर करावा, पर्यावरणाचा ऱ्हास कशाप्रकारं रोखता येईल? यांसारख्या अनेक विषयांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. डी. एस. हायस्कूल आणि चेंबूर जिमखाना यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

येत्या पिढीला पर्यावरणाच महत्त्व समजलं पाहिजं यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला होता. यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मदत घेत अनेक शोभिवंत वस्तू, रंगीत पोस्टर्सही बनवून उपस्थित नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचं महत्व पटवून दिल. 

- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा