Advertisement

महापालिकेचे उद्यान प्रदर्शन की सेलिब्रिटी प्रदर्शन!


महापालिकेचे उद्यान प्रदर्शन की सेलिब्रिटी प्रदर्शन!
SHARES

मुंबई महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेले उद्यान प्रदर्शन हे सेलिब्रिटीजचे प्रदर्शन ठरत चालले असून मागील २२ वर्षांत आयोजित केलेल्या प्रदर्शनात न फिरकणाऱ्या सेलिब्रिटीजनी या यावेळी मात्र आवर्जून हजेरी लावली. विशेष म्हणजे या उद्यान प्रदर्शनात सेलिब्रिटीजना आणून या ठिकाणी येणाऱ्या लोकांचीही उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळेच मागील तीन दिवसांमध्ये तब्बल सव्वा लाख नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे.


अॅनाकोंडा, ऑक्टोपस आणि शिकाराही!

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले (राणीबाग)उद्यानात शुक्रवार ९ तारखेपासून तीन दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात या वर्षी जलप्रदूषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा (काश्मिरी पद्धतीची नाव) देखील या नदीमध्ये आहे. यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, अॅनाकोंडा यासारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात आहेत.शेवटच्या दिवशी अर्थात रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुमारे ५० हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ३५ हजार, तर दुसऱ्या दिवशी सुमारे ४० हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. त्यामुळे आतापर्यंत १ लाख २५ हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे.

जितेंद्र परदेशी, उद्यान अधिक्षक


चंदेरी दुनियेच्या सेलिब्रिटिजची उपस्थिती

या प्रदर्शनाचे हे २३ वे वर्ष आहे. परंतु, आजवर कधीही सेलिब्रिटीजना न बोलवणाऱ्या पालिका प्रशासनाने या प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु, प्रदर्शनाला उपस्थित राहू शकत नसल्याने अमिताभ बच्चन यांनी पत्र पाठवून प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. तर अभिनेते ऋषी कपूर, फरहान अख्तर, रमेश भाटकर, मनीष पॉल, नीता शेट्टी, कमलाकर सातपुते, अन्नू कपूर, वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे, सुनील पाल, वैशाली सामंत आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

संबंधित विषय