Advertisement

बॉम्बे जिमखाना सर्वसामान्यांसाठी खुला


बॉम्बे जिमखाना सर्वसामान्यांसाठी खुला
SHARES

आंदोलनासाठी आझाद मैदान तर क्रीडा उपक्रमासाठी बॉम्बे जिमखाना प्रसिद्ध आहे. मात्र याच जिमखान्या समोरील जमीन सार्वजनिक असतानाही या मैदानात खेळण्यासाठी गेलेल्या मुलांची सुरक्षा रक्षकांकडून अडवणूक होत असल्याचे समोर आले होते.

मात्र आता बॉम्बे जिमखान्यासमोरील जमीन सार्वजनिक असल्याची सूचना मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेला दिली आहे. "नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बॉम्बे जिमखान्याला 16 जुलै, 2016 रोजी पालिकेने नोटीस बजावली होती. त्यानंतर 11 अॉगस्ट 2016 ला ही जमीन सर्वसामान्य जनतेसाठी खुली राहणार असल्याचं उत्तर देण्यात आले होते, असं जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी 5 एप्रिलला एका पत्रातून म्हटलं होतं. 

25 जानेवारी 1941 साली फोर्ट महसूल विभाग भूकर क्रमांक 730, 1/730 नुसार ही जागा बॉम्बे जिमखान्याला भाडेतत्वावर देण्यात आली होती. पण आता भाडेपट्टीची मुदत संपुष्टात आली असून, त्याच्या नूतनीकरणाचा विचार असल्याचं 'मुंबई लाइव्ह'कडे असलेल्या पत्रातून समोर आलं आहे. तसंच त्या पत्रानुसार 'सर्वसामान्यांना प्रवेश देण्यासाठी कोणतीच बंदी नाही, ही जमीन सर्वांसाठी खुली असल्याचा एक फलक या ठिकाणी लावण्याचा विचार असल्याचं सांगण्यात आलंय. 

ज्या जमिनीवर जिमखाना उभा आहे, तो महसूल विभागाच्या अंतर्गत येतो. पालिकेच्या ए प्रभागाचे सहाय्यक आयुक्त दिघावकर यांनी सांगितलं की, ''मुंबईत अनेक ठिकाणी सर्वसामान्यांसाठी खुली जागाच नसल्याची तक्रार होती. तर वॉर्ड क्रमांक 225 चे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सानप यांनी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून मागणी केली होती की, यापुढे बॉम्बे जिमखान्याला दिलेल्या जमिनीच्या भाडेतत्वाची मुदत वाढवू नये. ती जमीन सामान्य जनतेसाठी खुली व्हावी. बॉम्बे जिमखान्यासमोरील जमीन सर्वसामान्यांसाठी खुली असतानाही सुरक्षा रक्षक सर्वसामान्यांना अडवत आहेत. यासंदर्भात बॉम्बे जिमखान्याचे डेरिअस उदयवाला यांना विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा