Advertisement

२६ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला हायकोर्टाकडून गर्भपाताची परवानगी


२६ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला हायकोर्टाकडून गर्भपाताची परवानगी
SHARES

मुंबई उच्च न्यायालायाने २६ आठवड्यांची गर्भवती असलेल्या १३ वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देत मोठा दिलासा दिला आहे. अल्पवयीन मुलगी ही बलात्कार पीडित असून तीच्या गर्भधारणेला २० आठवडे उलटल्यानं कुटुंबियांनी गर्भपातासाठी उच्च न्यायालयाकडे दाद मागीतली होती. या याप्रकरणी केईम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतरच उच्च न्यायालयानं मुलीच्या बाजूनं निकाल दिला.


चुलत भावानेच केला होता अत्याचार

पीडित अल्पवयीन मुलगी ही केवळ १३ वर्षांची असून २६ आठवड्यांची गर्भवती होती. मात्र ती गर्भवती असल्याचं उशिरा लक्षात आल्यानं तीच्या कुटुंबासमोर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याव्यतिरिक्त कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. देशात २० आठवड्यानंतर गर्भपात करण्यास सक्त मनाई आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरात राहाणाऱ्या चुलत भावानेच मुलीवर सतत अत्याचार केला होता.


यामुळे मुलीला गर्भपाताची परवानगी मिळाली

प्रकरण उच्च न्यायालयात येताच कोर्टानं केईमच्या डॉक्टरांची कमिटी गठन करत मुलीच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश दिलं होतं. मुलीनं बाळाला जन्म दिल्यास बाळ जन्मतःच मानसिक रोगी होण्याची शक्यता यावेळी या कमिटीकडून देण्यात आलेल्या अहवालात वर्तवण्यात आली होती. त्याचबरोबर ही मुलगी वयानं अतिशय लहान असून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या गर्भधारणेस तयार नसल्याचं या कमिटीनं कोर्टाच्या लक्षात आणून दिलं.

कमिटीच्या अहवालाकडं पहाता मंगळवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि शंतनू केमकर यांच्या खंडपीठाने २६ आठवड्यांनंतरही मुलीला गर्भपाताची परवानगी दिली.


हेही वाचा - 

'२६ आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी द्या' हायकोर्टात याचिका दाखल


Read this story in English or हिंदी or English
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा