Advertisement

New Year : विनापरवाना गाणी वाजवण्यास मुंबई उच्च न्यायालयाची बंदी

मुंबईसह राज्यभरात नाताळ व 31st पार्टीच्या तयारीला जोरदार सुरूवात झाली आहे.

New Year : विनापरवाना गाणी वाजवण्यास मुंबई उच्च न्यायालयाची बंदी
SHARES

मुंबईसह राज्यभरात नाताळ व 31st पार्टीच्या तयारीला जोरदार सुरूवात झाली आहे. नाताळ व 31st च्या रात्री गाण्यांवर नाचात-गाजत मोठ्या उत्साहात नव वर्षाचं स्वागत करण्यात येत. तसचं, आता अवघे ७ दिवस शिल्लक राहिले असताना ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताकरीता पार्ट्यांच्या आयोजनासाठी विविध हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ सज्ज झाले आहेत. मात्र, अशा ठिकाणी होणाऱ्या मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत.

न्यायालयाचा आदेश

'मुंबईतील हॉटेल्स, पब्ज आणि रोस्तराँमध्ये ख्रिसमस आणि नव्या वर्षांच्या निमित्तानं आयोजित पार्ट्यांमध्ये फिल्मी आणि गैरफिल्मी गाणी परवाना शुल्क व सुरक्षित कॉपीराईट परवानग्या दिल्याशिवाय वाजवता येणार नाहीत. कोणत्याही प्रकारची गाणी वाजवण्यापूर्वी आयोजकांनी त्यासाठीचं परवाना शुल्क भरून ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स’ची (पीपीएल) परवानगी घ्यावी’, असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

स्वामित्व हक्क

स्वातंत्र्यपूर्व काळात १९४१ मध्ये ‘पीपीएल’ची स्थापना झाली. संस्थेकडं विविध भाषांतील २५ लाखांहून अधिक चित्रपट आणि अन्य गाण्यांचे स्वामित्व हक्क आहेत. त्यामुळं विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करताना तसेच नववर्षांचे स्वागत करताना संस्थेची परवानगी घेणं आणि गाणी वाजवण्याचे परवाना शुल्क देणं गरजेचं आहे.

आदेशांचे पालन

हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये ख्रिसमस आणि नववर्षांनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये संस्थेचे स्वामित्व हक्क असलेली गाणी विनापरवाना वाजवण्यात येत असल्याचा आरोप केला. तसंच परवाना शुल्क देणं आणि संस्थेची परवानगी घेण्याबाबत आयोजकांना दिलेल्या आदेशांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयाकडं करण्यात आली होती.

संस्थेची मागणी मान्य

मुंबई उच्च न्यायालयानं या संस्थेची मागणी मान्य करीत ख्रिसमस आणि नववर्षांनिमित्त आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये संस्थेचे स्वामित्व हक्क असलेली चित्रपट आणि अन्य गाणी वाजवताना संस्थेची परवानगी घेण्याचे आदेश हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पबमालकांना दिले आहेत.



हेही वाचा -

अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गडद पिवळ्या रंग

राज्यातील शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा