फ्लॅटमालकाला पार्किंग मिळालंच पाहिजे, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

वांद्र्यातील एका हाऊसिंग सोसायटीच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. वांद्र्यातील या हाऊसिंग सोसायटीत एका व्यक्तीने फ्लॅट खरेदी केला. परंतु हाऊसिंग सोसायटीने त्याला कार पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यानंतर या फ्लॅट मालकाने स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली. तिथं सोसायटीच्या विरोधात निर्णय आला. त्यानंतर सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. इथंही न्यायालयाने स्थानिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

  • फ्लॅटमालकाला पार्किंग मिळालंच पाहिजे, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
SHARE

एखाद्या इमारतीत राहणाऱ्या फ्लॅटमालकाला संबंधित इमारत परिसरात एक हक्काचं कार पार्किंग मिळालंच पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिला आहे.


नेमकं प्रकरण काय ?

वांद्र्यातील एका हाऊसिंग सोसायटीच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. वांद्र्यातील या हाऊसिंग सोसायटीत एका व्यक्तीने फ्लॅट खरेदी केला. परंतु हाऊसिंग सोसायटीने त्याला कार पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली नाही.

त्यानंतर या फ्लॅट मालकाने स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली. तिथं सोसायटीच्या विरोधात निर्णय आला. त्यानंतर सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. इथंही न्यायालयाने स्थानिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
काय म्हटलं न्यायालयाने?

मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना सांगितलं की, इमारतीत राहणाऱ्या फ्लॅट मालकाला इमारत परिसरातील एक कार पार्किंग मिळालंच पाहिजे. सोबतच जर इमारतीतील दुसऱ्या फ्लॅटमालकाला आणखी एक पार्किंगची जागा हवी असल्यास सोसायटीने त्याला जागा उपलब्ध करून द्यावी.


अतिरिक्त चार्ज

एखाद्या फ्लॅट मालकाला त्याची पार्किंगची जागा नको असल्यास आवश्यकता असणाऱ्या फ्लॅटमालकाला ती द्यावी. केवळ वर्षभरासाठी या तत्त्वानुसार देखील आवश्यकता असणाऱ्या फ्लॅटमालकांना जागा उपलब्ध करून देता येईल. त्यासाठी सोसायटी अतिरिक्त चार्ज देखील घेऊ शकते.हेही वाचा-

सिडको म्हाडावर भारी, 1 लाख 79 हजार 557 अर्ज सादर

झोपडपट्टीवासीयांना आता 'आसरा'चा आसरा!संबंधित विषय
ताज्या बातम्या