Advertisement

झोपडपट्टीवासीयांना आता 'आसरा'चा आसरा!

'एसआरए'च्या 'आसरा' अॅपचं उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानुसार झोपडपट्टीवासीयांना हवी ती माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळेल. त्याचा मोठा फायदा त्यांना होईल, असा विश्वास 'एसआरए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी व्यक्त केला.

झोपडपट्टीवासीयांना आता 'आसरा'चा आसरा!
SHARES

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची वा त्यातील एखाद्या प्रकल्पाची माहिती हवी असल्यास झोपडपट्टीतील रहिवाशांना आता झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) कार्यालयाच्या प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही. कारण ही सर्व माहिती 'एसआरए'ने मोबाईलवर उपलब्ध करून दिली आहे, ती एका अॅपच्या माध्यमातून.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाॅन्च

'एसआरए'च्या 'आसरा' अॅपचं उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानुसार झोपडपट्टीवासीयांना हवी ती माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळेल. त्याचा मोठा फायदा त्यांना होईल, असा विश्वास 'एसआरए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी व्यक्त केला.




अडचणी काय?

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी तसंच झोपडपट्टीवासीयांचं जीवनमान उंचावण्यासाठी 'एसआरए' योजना हाती घेण्यात आली आहे. त्याद्वारे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करत झोपडीधारकाला इमारतीत मोफत घरं दिली जातात. पण या योजनेची योग्य ती माहिती 'एसआरए'कडून वा बिल्डरकडून झोपडपट्टीवासीयांना मिळत नाही. अनेकदा त्यांची फसवणूक होते. एखादी माहिती हवी असेल तर 'एसआरए'च्या फेऱ्या माराव्या लागतात. 'आरटीआय'चा वापर करावा लागतो. आपली झोपडी कुठं आहे, योजना कोण, कशी राबवत आहे? अशा गोष्टीही झोपडपट्टीवासीयांना समजत नाहीत.


कसा फायदा होणार?

या सर्व अडचणी लक्षात घेत 'एसआरए'ने आसरा हे अॅप तयार केलं आहे. मराठी आणि इंग्रजीत असलेल्या या अॅपद्वारे 'एसआरए' योजनांची इत्थंभूत माहिती मोबाईलवर मिळणार आहे. 'एसआरए' योजनेबरोबरच 'एसआरए' प्रकल्पाची माहिती, आपली झोपडी कुठं आहे, पुनर्वसन क्षेत्राची माहिती अशी सर्व माहिती या अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मंगळवार ११ सप्टेंबरपासून हे अॅप कार्यान्वित झालं आहे. पण झोपडपट्टीवासीयांनी हे लक्षात घ्यावं की 'एसआरए'च्या तक्रारी, अडचणींचं निराकरण करण्यासाठी त्यांना 'एसआरए'तचं जावं लागेल. 



हेही वाचा-

गुडन्यूज! २०११ पर्यंतच्या झोपड्यांना अडीच लाखाचं अनुदान

खासगी संस्थांना दिलेली रुग्णालये ताब्यात घ्या, नगरसेवकांची मागणी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा