Advertisement

आईला त्रास द्याल, तर घरात प्रवेश नाही!

'आईला त्रास देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या मुलांना घरात प्रवेश करण्याचा कोणताच अधिकार नसेल', असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

आईला त्रास द्याल, तर घरात प्रवेश नाही!
SHARES

'आईला त्रास देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या मुलांना घरात प्रवेश करण्याचा कोणताच अधिकार नसेल', असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.


उच्च न्यायालयात याचिका दाखल

दक्षिण मुंबईतील एक व्यक्ती हा त्याची पत्नी आणि मुलांसह त्याच्या ७२ वर्षीय आईच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे त्याच्या आईने त्या घराचं कुलूपच बदलून टाकलं. त्यामुळे मुलाने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरुख कथावल्ला म्हणाले, "जो मुलगा आईला त्रास देत असेल किंवा मारहाण करत असेल आणि त्याची वागणूक चांगली नसेल तर त्याला आपल्या आईच्या घरात प्रवेश करण्याचा कोणताच अधिकार राहणार नाही"


'त्या' आईला मिळाला न्याय

यावेळी ७२ वर्षीय महिलेनं न्यायालयासमोर सांगितलं की, त्यांचा मुलगा त्यांना चांगली वागणूक देत नव्हता, याच त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी घराचं कुलूप बदललं. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर त्यांना न्याय मिळाला आहे. आता त्या आपल्या घरात राहू शकतात आणि पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली आहे.



हेही वाचा-

दिलीप कुमारांचं घर बळकावू पाहणाऱ्या बिल्डराचा जामीन अर्ज फेटाळला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा