Advertisement

मुंबई पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी बाऊन्सर्स

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत.

मुंबई पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी बाऊन्सर्स
SHARES
राजकीय नेते, उद्योगपती, बाॅलिवूडचे सेलिब्रिटी आदींच्या मागेपुढं असणारे बाऊन्सर्स आता मुंबई महापालिकेत दिसत आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत. 


आयुक्तांनी स्वतःसाठी आणि पालिकेतील इतर चार अतिरिक्त आयुक्तांच्या सुरक्षेसाठी दहा बाऊन्सर नेमले आहेत. मात्र, सुरक्षेसाठी  बाऊन्सर्स ठेवणं हा आता वादाचा विषय ठरला आहे. पालिकेचे साडेतीन हजार सुरक्षा रक्षक असतानाही थेट खाजगी सुरक्षा रक्षक नेमून लाखोंची उधळपट्टी करण्याची काय गरज आहे? आयुक्तांचा पालिकेच्या सुरक्षारक्षकांवर विश्वास नाही का, असा सवाल विरोधी पक्षाने केला आहे.


हे खासगी बाउन्सर इगल नावाच्या कंपनीचे आहेत. पालिकेत खासगी सुरक्षा रक्षक तैनात केल्याची ही पहिलीच घटना आहे. तर भाजपकडून यावर टीका केली जात असून खासगी बाउन्सरची गरज का पडली आणि त्यांचा पगार कोण देत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. 

कोरोना आरोग्य केंद्रे उभारणी, पीपीई किट, हँण्डग्लोव्हज, मृतदेहांचे पॅकिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाॅडी बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊनही त्याची उत्तरे दिली नसल्याने मागील आठवड्यात भाजप नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून त्यांच्या नेमप्लेटवर निषेधाचे फलक चिकटवले होते. तसंच बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेराव घालत त्यांना कोंडून ठेवले होते. याचाच धसका बहुधा आयुक्तांनी घेतल्याचे दिसतं आहे.. नगरसेवक हे गुंड आहेत का, त्याच्यासाठी बाऊन्सर्स बोलवले जात आहेत, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केला आहे.

दरम्यान, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी खासगी बाऊन्सर घेतले नसल्याचं सांगितलं आहे. पालिकेने नेमलेल्या खासगी सुरक्षारक्षकांमधून दहा जणांना घेण्यात आले आहे. मला सुरक्षेची कधीच गरज भासत नाही. सुरक्षा व्यवस्थेवरचा माणूस तरतरीत आणि स्मार्ट दिसला पाहिजे. त्यामुळे साध्या कपड्यातील सुरक्षारक्षकांना बाऊन्सरसारखा गणवेश देऊन नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र नाही. तसेच खासगी सुरक्षारक्षांसोबत पालिकेचे सुरक्षारक्षही राहणार आहेत, असं चहल यांनी सांगितलं.



हेही वाचाः

Mumbai Rains : मुंबईत बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, तर 'या' जिल्ह्यांना इशारा

मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेलं पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा