Advertisement

टेरेसवर कॉफी पित असताना वीज पडून तरुणाचा मृत्यू

गुरुवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.

टेरेसवर कॉफी पित असताना वीज पडून तरुणाचा मृत्यू
SHARES

नवी मुंबईत वीज पडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दु्र्दैवी घटना समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यावेळी खारघरमध्ये टेरेसवर काॅफी पित बसलेल्या तरूणांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

सागर विश्वकर्मा असं मृत तरुणाचं नाव आहे. सागर ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होता. गुरूवारी संध्याकाळी विजांच्या कटकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. सागर यावेळी कॉफी पीत टेरेसवर बसला होता. यावेळी टेरेसवर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. वीज पडून फ्लोअरला तडाही गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. तरुण मुलगा गमावल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांचं तसंच शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसात हाताला आलेलं पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.  पावसाच्या पाण्यात काही जण वाहून गेल्याच्याही घटना समोर आल्या.हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार

खाजगी सुरक्षारक्षकांना लोकलने प्रवासाची परवानगीRead this story in हिंदी
संबंधित विषय