गळक्या पाइपमुळे वाटसरू त्रस्त

 Girgaon
गळक्या पाइपमुळे वाटसरू त्रस्त
गळक्या पाइपमुळे वाटसरू त्रस्त
गळक्या पाइपमुळे वाटसरू त्रस्त
See all

गिरगाव - पोदार भवन इमारतीमधील सांडपाण्याची पाइपलाइन गेल्या चार महिन्यापासून खराब झालीय. या खराब झालेल्या पाईपलाईनमुळे सांडपाणी बिल्डिंग खालून जाणाऱ्या वाटसरूंवर पडतं. एवढंच नाही तर या सांडपाण्याचा त्रास खाली असलेल्या दुकानदारांनाही होतो. याबाबत इमारतीमधील रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या मात्र पालिका प्रशासन आणि नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच आम्ही आमच्या पैशानं किती वेळा पाईप बदलणार असं स्थानिक रहिवासी मनोज माकवान यांनी सांगितलं. दुकानदार कमलेश शहा यांनीही सांडपाण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान नगरसेविका युगंधरा साळेकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Loading Comments