Advertisement

मलवाहिनी टाकता येणार नाही तिथे बायोटॉयलेट


मलवाहिनी टाकता येणार नाही तिथे बायोटॉयलेट
SHARES

मुंबईमध्ये सध्या घरोघरी शौचालय बांधण्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. सार्वजनिक शौचालयांची उभारणीही युध्दपातळीवर होत आहे. परंतु, अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिनीच टाकलेल्या नसल्याने घरोघरी शौचालय उभारणीच्या कामाला खिळ बसत आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मलवाहिनी टाकता येत नसेल त्या त्या भागांमध्ये बायोटॉयलेट बसवण्याची व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली आहे.


मलनि:सारण वाहिन्या न टाकल्याने...

मुंबईत सध्या लॉट ११ अंतर्गत सार्वजनिक तसेच सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जात आहे. घरोघरी शौचालय उभारणीसाठी प्रोत्साहन म्हणून निधी जाहीर करूनही केवळ मलनि:सारण वाहिन्या टाकलेल्या नसल्यामुळे त्या कामाला खिळ बसली आहे. याबाबत शिवसेना नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलं होतं. घरोघरी शौचालय उभारण्यात मलवाहिनींमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता घरोघरी बायोटॉयलेट बांधण्यास परवानगी दिली जावी, तसेच सार्वजनिक ठिकाणीही बायोटॉयलेट बांधले जावेत, अशी सूचना शेवाळे यांनी केली होती.


३५०० शौचकुपे बांधून तयार

वैशाली शेवाळे यांनी केलेल्या सुचनांची दखल घेऊन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्या निवेदनांमध्ये या बायोटॉयलेटचा उल्लेख केला. नगरसेविकेने केलेल्या सूचना योग्य असून जिथे जिथे मलनि:सारण वाहिनी टाकता येत नसेल त्याठिकाणी असे बायोटॉयलेट बांधण्यात येतील, असं मेहता यांनी स्पष्ट केलं. याआधी मरिन ड्राईव्ह येथे बायोटॉयलेटची उभारणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आतापर्यंत लॉट १० मध्ये ५२०० शौचकुपांपैकी ३५०० शौचकुपे बांधून तयार झाली आहेत. तर लॉट ११मध्ये २२ हजार २९२ शौचकुपे बांधण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा