भिवंडीत इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू


भिवंडीत इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू
SHARES

भिवंडीत इमारत कोसळल्याने 1 जण दगावला असून अनेक जण जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. यामध्ये सुरुवातीला 6 जणांना वाचवण्यात यश आलं. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य सुरू करत आणखी तिघांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. दरम्यान ढिगाऱ्याखाली अजूनही पाच जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीत कोसळलेली इमारत ही तीन मजली होती. एनडीआरएफच्या पथकाकडून अजूनही बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत एकूण आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं असून यामधील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संबंधित विषय