Advertisement

परिमंडळ ४ मध्ये महापालिकेने 'इतक्या' इमारती केल्या सील

मालाड, गोरेगाव भागात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्यानं संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात इमारती सील करण्यात येत आहेत.

परिमंडळ ४ मध्ये महापालिकेने 'इतक्या' इमारती केल्या सील
SHARES

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालला आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येला रोखण्यासाठी महापालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, दाटीवाटीच्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास संबंधित परिसर सील करण्यात येतो. त्यानुसार, महापालिकेनं परिमंडळ ४मध्ये तब्बल ७९० इमारती सील केल्याची माहिती समोर येत आहे. मालाड, गोरेगाव भागात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्यानं संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात इमारती सील करण्यात येत आहेत.

या भागांत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५९५पर्यंत पोहोचली आहे. अंधेरी, मालाडमध्ये रुग्णसंख्येनं २,५००चा आकडा ओलांडला आहे. तर गोरेगावमधील रुग्णसंख्या १५००च्या उंबरठ्यावर आहे. मुंबईतील अन्य वॉर्डमध्ये प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळं तेथील जनजीवन हळुहळू पूर्वपदावर येत आहे. धारावीसदृश स्थिती मालाडमध्ये निर्माण झाली आहे. अंधेरी, मालाड, गोरेगाव परिसरात अद्याप रुग्णांची संख्य घटलेली नाही.

हेही वाचा - प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट, ‘या’ निर्णयावर सर्वांचे एकमत

दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या भागांमध्ये अधिकाधिक चाचणी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे, चिंचोळे रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मालाड, मालवणी, आप्पापाडा इथं झोपडपट्टी वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर गोरेगावातील काही भागांमध्ये रुग्णसंख्या दुपटीचा वेग अधिक आहे.

कोरोनाबाधितांकडून सर्वसामान्यांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी इमारतीचे निर्जंतुकीकरण करणे, बाधितांच्या थेट संपर्कात असणाऱ्यांच्या ये-जा करण्यावर अंकुश ठेवणे, घरोघरी तपासणी करणे, असे उपाय करण्यात येत आहेत.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी मोठी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७ रुग्ण दगावले आहेत. तर ९ जून रोजी ६१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ८ जून रोजी रोजी एकूण ५३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५२ हजार ४४५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  कोरोनाचे ७५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण २३ हजार ६९३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

मुंबईत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी

तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा