Advertisement

मुंबई महापालिकेत ‘इतक्या’ जागा रिक्त, पण...

नोकरभरतीवरील स्थगितीमुळे सद्यस्थितीत मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेत ‘इतक्या’ जागा रिक्त, पण...
SHARES

मुंबई महापालिकेच्या (bmc) घसरलेल्या आर्थिक डोलाऱ्याचा फटका नोकरभरतीवरही झाला आहे. जोपर्यंत महापालिकेचं उत्पन्न वाढत नाही, तोपर्यंत सर्व रिक्त पदांवरील भरती तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी (bmc commissioner praveen pardeshi) यांनी अर्थसंकल्प (bmc budget 2020) सादर करताना दिली. 

हेही वाचा- BMC Budget 2020: कोस्टल रोडसाठी २ हजार कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (bmc budget 2020) नुकताच महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी (bmc commissioner praveen pardeshi) यांनी सादर केला. महापालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने ही स्थिती सुधारण्यासाठी महापालिका राखीव निधीतून ४३८० कोटींचं कर्ज घेणार आहे. सोबतच अर्थसंकल्पावरील भार कमी करण्यासाठी जोपर्यंत महसुलात (revinue) वाढ होत नाही, तोपर्यंत रिक्त पदावरील भरती (new recruitment) तात्पुरती थांबवण्यात येत असल्याची घोषणाही आयुक्तांनी केली. महापालिकेत तब्बल ३७ हजार जागा रिक्त असताना नोकरभरती थांबवण्यात आल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे.  

सातव्या वेतन आयोगामुळे (7th pay commission) कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक १३०० कोटीचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर पडणार आहे. वेतनावरील खर्च अटळ असल्याने आस्थापना खर्च कमी करणं आवश्यक आहे. त्यामुळे थेट भरती थांबवल्यास दरवर्षी २५० कोटींची बचत महापालिकेला अपेक्षित आहे. सेवानिवृत्तीमुळे होणारी रिक्त पदे भरण्यात येणार नाहीत. कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाइम भत्त्याचं प्रमाण कमी होईल, अशा रितीने कामाच्या तासांचं नियोजन करण्यात येणार आहे. परिणामी निधीची बचत होण्यास मदत होईल, असं महापालिकेला वाटत आहे. 

महापालिकेत सध्या १ लाख ५ हजार ९८१ कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून आणखी १ लाख ४३ हजार ९०१ कर्मचारी-अधिकाऱ्यांची गरज आहे. सध्या महापालिकेत ३७ हजार ८२० जागा रिक्त आहेत.

हेही वाचा- BMC Budget 2020: महापालिका उघडणार सीबीएसई, आयसीएससी शाळा

विविध विभागांमध्ये मुलभूत प्रशासकीय काम करणारे लिपिक आणि उद्याने, विधी आणि अभियंता खात्यातील तांत्रिक कर्मचारी यासारख्या कामासाठी ६ महिने किंवा १ वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार घेण्याचं महापालिकेने (bmc) ठरवलं आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या (bmc) नोकरीवर अधिकार राहाणार नाही. राज्य सरकारने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार कायद्यामध्ये केलेल्या सुधारणांमधील तरतुदीनुसार महापालिका या उमेदवारांना विद्यार्थी वेतन देईल, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. 

परंतु नोकरभरतीवरील स्थगितीमुळे सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा