Advertisement

कुपर रुग्णालयात डॉक्टर, रुग्णांसाठी बससेवा


कुपर रुग्णालयात डॉक्टर, रुग्णांसाठी बससेवा
SHARES

प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि मुंबई बाहेरील रुग्णांसाठी मुंबई महानगरपालिकेकडून नवीन बस रुजू करण्यात आली आहे. त्यामुळे लांबपल्ल्यांवर असलेल्या वैद्यकीय अध्ययन केंद्रांना भेटी देणं डॉक्टरांना सोपं होणार आहे. शिवाय, या बसमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांना आरोग्य सेवा देणं सोपं होणार आहे, असं कुपर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


३० आसनी नवीन बस

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयातील जन औषध वैद्यकशास्त्र विभागाला पालिकेकडून ३० आसनी नवीन बस शुक्रवारी मिळाली. या बसचा उपयोग एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि विविध आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या भेटीसाठी होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तसंच, कुपर रुग्णालयापासून लांबपल्ल्यावर असणाऱ्या झोपडपट्टी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या तपासणीसाठी या बसचा वापर होणार आहे.

या बसच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश सुखदेवे, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजन कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा