• आता बसस्टॉपही झाले 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस'!
  • आता बसस्टॉपही झाले 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस'!
SHARE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकाच्या नामकरणानंतर आता स्थानकाबाहेरील बसस्टॉपचे नावही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले आहे.

यापूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या नावात 'महाराज' नसल्याने बराच वाद झाला. अनेक संघटनांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामकरण करावे, अशी मागणी रेल्व प्रशासनाकडे केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) असे नामकरण करण्यात आले. पण त्याची अंमलबजावणी ही फक्त रेल्वे स्थानकावरच झाली.

रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या बेस्ट बस स्थानकाचे नाव मात्र छत्रपती शिवाजी टर्मिनस असेच होते. त्यात बदल न केल्यामुळे भायखळ्यातील जीवन परिवर्तन संस्थेने याचा विरोध करत महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना 6 जुलै रोजी अर्ज करून तात्काळ यामध्ये बदल करावा, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत आता महापालिका प्रशासनाने रेल्वे स्थानकाबाहेरील बस स्थानकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे केले आहे.


या नावात बादल करण्यात यावा म्हणून 6 जुलै रोजी महापालिकेला विनंती अर्ज केला. सोमवारी त्याबद्दल विचारणा करण्यासाठी महापालिकेत जात असताना नावात बदल झालेला दिसला. याबद्दल पालिकेचे आभार व्यक्त करतो.

समीर गायकवाड, सचिव, जीवन परिवर्तन संस्था


हेही वाचा -

सीएसटीएमचे दोन दरवाजे होणार बंद!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या