• 'सीएसटी'चं झालं 'सीएसटीएम'
  • 'सीएसटी'चं झालं 'सीएसटीएम'
SHARE

रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी टर्मिनस(सीएसटी)चे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे केले आहे. परंतु या स्थानकावरून रेल्वेचे तिकीट बुक करायचे असल्यास आपल्याला (सीएसएमटी) या नावाचा उपयोग करता येणार नाही. 


कारण रेल्वे प्रशासनाने या स्थानकाच्या नावाचे लघुरूप अर्थात कोड नेम 'सीएसएमटी' ऐवजी 'सीएसटीएम' असे ठेवले आहे. त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुकींग करतानाही आपल्याला स्थानकांच्या लघु नामावलीत 'सीएसटीएम' हेच नाव दिसून येईल. 

  


'सीएसटीएम' मागचे कारण?

कोल्हापूरमधील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे लघुरूप 'सीएसएमटी' असे आहे. त्यामुळे हा स्टेशन नेम कोड कोल्हापूरच्या टर्मिनससाठी वापरण्यात येतो. तोच कोड मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराज (सीएसटीएम) ला वापरल्यास प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडू शकतो. 

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबईतील टर्मिनसला 'सीएसएमटी' ऐवजी 'सीएसटीएम' हे लघुरुप वापरण्याचे ठरवले आहे. याआधी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस होते. मार्च 1996 मध्ये त्याचे नाव बदलण्यात आले होते.राष्ट्रपुषांचे नाव देताना...

राष्ट्रपुरुषांची नावे वास्तू किंवा एखाद्या ठिकाणाला देतानाही त्यांच्या पूर्ण नावाऐवजी लघुरुप देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.हे देखील वाचाा -

सीएसटीएमचे दोन दरवाजे होणार बंद!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या