बसस्टॉप की गाड्यांचे पार्किंग

 Sandhurst Road
बसस्टॉप की गाड्यांचे पार्किंग

सँडहर्स्ट - येथील चार नळ परिसरात असलेला बसस्टॉप सध्या पार्किंगचे ठिकाण बनलाय. त्यामुळे त्यामुळे हा बसस्टॉप लोकांसाठी की गाड्यांच्या पार्किंगसाठी आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. बस क्रमांक 42 आणि 134 साठी हा स्टॉप बनवण्यात आला होता, मात्र याठिकाणी दुचाकी, घोडागाडी यासह अनेक वाहन सर्रास उभी केली जातात. दरम्यान या गाड्यांचे अतिक्रमण हटवून स्टॉप नागरिकांसाठी पालिकेने खुला करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या वाहनांमुळे येथे वाहतुकीचीही मोठी समस्या निर्माण झाल्याचं सुनील गव्हाणे या स्थानिकांनी सांगितले.

Loading Comments