Advertisement

राणी बागेत रविवारी विक्रमी पर्यटक, एका दिवसात ६ लाखांचं उत्पन्न

भायखळा येथील राणीची बाग (Byculla zoo -वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय) आता गजबजली आहे. नुतनीकरण केल्याने आणि नवीन प्राणी आल्यामुळे राणीच्या बागेला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

राणी बागेत रविवारी विक्रमी पर्यटक,  एका दिवसात ६ लाखांचं उत्पन्न
SHARES

भायखळा येथील राणीची बाग (Byculla zoo -वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय) आता गजबजली आहे. नुतनीकरण  केल्याने आणि नवीन प्राणी आल्यामुळे राणीच्या बागेला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रविवारी राणी बागेला ६ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. एका दिवसातील हे सर्वाधिक उत्पन्न आहे.  

राणी बागेच्या नूतनीकरणानंतर आठवड्याच्या अखेरीस सरासरी १२ हजार तर मधल्या दिवसांमध्ये सरासरी ६ हजार पर्यटक भेट देत आहेत. मागील रविवारी तर तब्बल १५ हजार पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली. या दिवशी तिकीट विक्रीतून राणी बागेला ६ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.  तिकिट दर वाढवल्याने उत्पन्नही चांगलंच वाढलं आहे. मुलांसाठी आता २५ रुपये तर प्रौढांसाठी ५० रुपये तिकिट दर आहे. 

नुकतेच राणी बागेत वाघांची जोडी आणण्यात आली आहे. औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानातून करिष्मा (मादी)आणि शक्ती (नरहे दोन पट्टेरी वाघ इथं आणण्यात आले आहेत.  याआधी मंगलोर प्राणिसंग्रहालयामधील बिबळ्या, कोल्हा, मोराची जोडी, सूरत प्राणिसंग्रहालयामधील अस्वल आदी राणीच्या बागेत दाखल झाले आहेत. हेही वाचा- 

सायन उड्डाणपूल २७ फेब्रुवारीपासून ५ दिवस बंद

लोअर परळ येथे डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा