Advertisement

भायखळा प्राणीसंग्रहालय उघडताच १ हजाराहून अधिक पर्यटकांनी दिली भेट

अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुमारे १ हजार ४१९ नागरिकांनी उद्यानाला भेट दिली.

भायखळा प्राणीसंग्रहालय उघडताच १ हजाराहून अधिक पर्यटकांनी दिली भेट
SHARES

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (Byculla Zoo) आणि प्राणीसंग्रहालय सोमवारपासून पुन्हा एकदा सर्व सामान्यांसाठी खुले झाले आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला भायखळा प्राणीसंग्रहालय म्हणून ओळखले जाते. 

कोरोनामुळे गेल्या वर्षभर उद्यान आणि प्राणीसंग्रहालय बंद होते. प्राणीसंग्रहालय अधिकृतपणे सोमवारी, १५ फेब्रुवारी रोजी सार्वजनिकपणे उघडले गेले.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुमारे १ हजार ४१९ नागरिकांनी उद्यानाला भेट दिली. त्यामुळे तिकिट विक्रितून सुमारे ६९ हजार ९०० इतके उत्पन्न जमा झाले. भायखळा प्राणीसंग्रहालयात ज्येष्ठांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

सोमवारी प्राणीसंग्रहालयात एक हजाराहून अधिक नागरिकांनी भेट देऊनही, अधिकारी म्हणाले की, विकडेजला ५ हजार ते६ हजार नागरिक भेट देतात. तर विकेंडला १५ हजारच्या आसपास हा आकडा जातो. वेळेचं बंधन असलं तरी प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नागरिक फार उत्सुक आहेत. सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रवेशद्वारांवर काही जण उभे राहतात.

सुरक्षा खबरदारीविषयी बोलताना एका प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आम्ही सॅनिटायझर्स ठेवले आहेत आणि सामाजिक अंतर सुनिश्चित केले आहे. कोणतीही गर्दी होऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक देखील आहेत.”

शक्ती आणि करिश्मा नावाचे दोन रॉयल बंगाल टायगर्स पर्यटकांसाठी एक आकर्षण आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालयात औरंगाबादच्या शहरातील प्राणिसंग्रहालयात हे वाघ आणण्यात आले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी भायखळा प्राणीसंग्रहालयाच्या सोशल मीडिया पृष्ठांचे उद्घाटन केले. हे मुंबई प्राणिसंग्रहालयाच्या बॅनरखाली येईल आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडिया साइट्सवर पक्षी आणि प्राण्यांचे क्रियाकलाप जगाबरोबर सामायिक केले जातील.



हेही वाचा

कोळीवाड्यांचं सीमांकन जलदगतीने पूर्ण करा, आदित्य ठाकरेंचे निर्देश

सोसायट्यांतील पाण्याच्या टाक्यांची २ वेळा होणार सफाई

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा