Advertisement

कोळीवाड्यांचं सीमांकन जलदगतीने पूर्ण करा, आदित्य ठाकरेंचे निर्देश

मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाचं काम सुरू असून उर्वरीत कोळीवाड्यांचं सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कोळीवाड्यांचं सीमांकन जलदगतीने पूर्ण करा, आदित्य ठाकरेंचे निर्देश
SHARES

मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाचं काम सुरू असून उर्वरीत कोळीवाड्यांचं सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री  अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी करावयाची प्रक्रिया जलद पूर्ण करण्यात यावी. यासंदर्भात लवकरच पुन्हा आढावा बैठक घेऊन कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत कार्यवाही करण्यात येईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, कोळीवाडे, आदिवासी पाडे किंवा गावठाणाचा भाग लगत आहे तिथं कोळीवाड्याचं सीमांकन करणं गरजेचं आहे. मुंबईतील बहुतांश कोळीवाड्यांचे सीमांकन झालं असून उर्वरित कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी लवकर सर्वेक्षण करावं, अशा सूचनाही अस्लम शेख (aslam sheikh) यांनी दिल्या.

यावेळी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यातील कोळीवाडे सीमांकनाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

(aaditya thackeray directs to complete koliwada land mapping process)

हेही वाचा- नाहीतर आपण लाॅकडाऊनच्या दिशेने जाऊ- महापौर


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा