Advertisement

नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

सर्वसामान्यांनीही मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा
SHARES

राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाही. ही अतिशय चिंतेची बाब आहे. प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी. तर सर्वसामान्यांनीही मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिला.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.

आढाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचं पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा.

राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचं पालन केलं जातं का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. जे नियमाचं पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले. ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तिथं कंटन्मेंट झोन करायची तयारी ठेवावी, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा

राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला २ महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रिय रुग्णालये करण्यात आली आहे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावं. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाण, शौचालय, बसस्थानके, उद्याने याठिकाणी निर्जंतुकीकरणाचं काम हाती घ्यावं. नियमांचं पालन करायचं की पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचं याची निवड लोकांच्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या काळात अधिक खबरदारी घ्यावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

महत्वाचे मुद्दे:

  • कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या भागात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत
  • ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेअंतर्गत’ सहव्याधी रुग्णांची परत विचारपूस सुरू करावी.
  • लाॅकडाऊन उठवण्यासाठी आलेल्या व्यावसायिक संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्यावी.
  • जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करावी.
  • बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करावी.
  • विवाह समारंभासाठी पोलीस परवानगी आवश्यक.

(follow the corona rules or face lockdown again in maharashtra warns cm uddhav thackeray)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा