Advertisement

१ नोव्हेंबरपासून राणीची बाग गजबजणार, 'हे' आहे नवीन आकर्षण

१ नोव्हेंबरपासून मुंबईतली वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान राणीची बाग पुन्हा गजबजणार.

१ नोव्हेंबरपासून राणीची बाग गजबजणार, 'हे' आहे नवीन आकर्षण
SHARES

१ नोव्हेंबरपासून मुंबईतली वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान राणीची बाग पुन्हा गजबजणार. याबाबत उद्यान प्रशासनाकडून कोरोना खबरदारीसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील आराखडाही तयार करण्यात आलाय.

उद्यानात मास्कशिवाय प्रवेश नसेल, तर गर्दी झाल्यासही गेट बंद करण्यात येईल, या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भायखळा प्राणीसंग्रहालय, जे राणी बाग म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांनी प्राणिसंग्रहालय पुन्हा सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. पुढील महिन्यात ते उघडण्याची शक्यता आहे कारण सभागृह आणि चित्रपटगृहे देखील २२ ऑक्टोबरनंतर लोकांसाठी खुली होतील.

“आम्ही पालिका आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. प्राणिसंग्रहालय १ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. आम्ही उघडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी करत आहोत, ”असं प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी म्हणाले.

दोन पेंग्विन बाळ आणि नवीन पक्षी हे मुख्य आकर्षण आहेत. या वर्षी १ मे आणि १९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या दोन पेंग्विन पिल्लांव्यतिरिक्त, पाहुण्यांना पहिल्यांदाच शक्ती आणि करीश्मा नावाच्या दोन रॉयल बंगाल वाघांची झलक पाहायला मिळेल. गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये त्यांना महाराष्ट्रातील औरंगाबादमधील सिद्धार्थ गार्डन आणि प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आलं होतं.

यासोबतच पक्ष्यांसाठी एक मोठा पिंजरा लावण्यात आला आहे. त्याच्या बाजूनं चालण्याचा मार्ग आहे तो देखील लोकांसाठी खुला केला जाईल.

प्राणिसंग्रहालयाला भेट देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला सध्या प्रत्येक भेटीत ५० रुपये द्यावे लागतात. तर मुलांकडून २५ रुपये आकारले जातात.

प्राणिसंग्रहालय शेवटचं फेब्रुवारी २०२१ मध्ये उघडण्यात आलं होतं. मार्च २०२० पासून साथीच्या आजारामुळे ११ महिने राणीची बाग बंद होती. तथापि, एका महिन्यानंतर, दुसरी लाट शहरात आल्यामुळे प्राणीसंग्रहालय पुन्हा बंद करण्यात आले होते.

नियमित दिवशी प्राणीसंग्रहालयात ५००० ते ६००० पर्यटक भेट देत असतात. तर आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी १५००० पर्यंत पर्यटकांचा आकडा जातो. प्राणिसंग्रहालय कोविड -19 च्या खबरदारीच्या उपायांचे पालन करताना केवळ ४००० ते ५००० पर्यटकांना प्रवेश दिला जाऊ शकतो, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा

भाज्यांचे दर गगनाला भिडले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाल १ वर्षांची मुदतवाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा