मुंबई महापालिकेतील लिपिकसह विविध लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई पालिकेकडून विभागीय स्तरावर मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक, लेखा सहाय्यक पदासाठी लेखी परीक्षा १६ ते १८ एप्रिल दरम्यान घेतल्या जाणार होत्या.

मुंबईसह राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांनी पालिकेने मुख्य लिपिक परीक्षा पुढे ढकलावी किंवा रद्द करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार ही परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. 

मुख्य लिपिक पदाच्या परीक्षेसाठी २१४० आणि वरिष्ठ लेखा परीखा व लेखा सहायक पदाच्या परीक्षेसाठी  ३९३ अशा एकूण २५३३ इच्छुक व पात्र उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार होती. शुक्रवारी १६ ते रविवार १८ एप्रिल २०२१ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.  कोविडच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. पण ही परीक्षा नियोजित तारखेलाच घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. ही परीक्षा रद्द करण्यासाठी परीक्षेला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे घातलं होतं. 



हेही वाचा - 

पाण्याचा वापर जपून करा; मुंबईला ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

१५ दिवसांच्या संचारबंदीत काय सुरू, काय बंद? वाचा