Advertisement

आता रक्तपेढ्यांमध्येही फार्मासिस्ट बंधनकारक?


आता रक्तपेढ्यांमध्येही फार्मासिस्ट बंधनकारक?
SHARES

औषध जिथे फार्मासिस्ट तिथे! अर्थात औषधांच्या निर्मिती-वितरण आणि विक्रीपर्यंत जिथे जिथे औषधांचा संबंध येतो, तिथे फार्मासिस्ट असणे बंधनकारक असते. आता यापुढे 'जिथे रक्त तिथे फार्मासिस्ट' असा शब्दप्रयोग लवकरच रूढ होणार आहे. कारण रक्तपेढ्यांमध्ये फार्मासिस्ट बंधनकारक करण्याचा केंद्राचा विचार असून त्यादृष्टीने केंद्राने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत.

केंद्राचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रुग्णांच्या हिताचा असल्याचे म्हणत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांसह जनआरोग्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही केली आहे.

औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार औषध कंपन्यांपासून औषध दुकानांपर्यंत औषधांच्या वितरण-विक्री फार्मासिस्टच्याच उपस्थितीत करणे बंधनकारक आहे. या नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात, बोगस फार्मासिस्टच्या उपस्थित औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची तरतूद कायद्यात आहे. दरम्यान, रक्तामधील प्लाझ्मासारखे घटक औषधांमध्ये मोडतात. मात्र तिथे फार्मासिस्ट नसतात. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्येही फार्मासिस्ट बंधनकारक करण्याचा विचार पुढे आला आहे.

त्यानुसार केंद्र सरकारच्या सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. यासंबंधीचा अभ्यासही झाल्याची माहिती असून हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासंबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने दिली आहे. यासंबंधीचा अध्यादेश येत्या दीड-दोन महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यताही असोसिएशनने व्यक्त केली आहे.

ही तरतूद प्रत्यक्षात आल्यास प्रत्येक रक्तपेढीमध्ये फार्मासिस्ट असणे बंधनकारक असणार असून या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात फार्मसी रेग्युलेशन कधी लागू होणार?

फार्मासिस्ट असेल तरच होलसेल औषध विक्रीसाठी परवाना


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा