Advertisement

रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर राहणार ड्रोनची नजर

रेल्वे प्रशासन मान्सूनसाठी सज्ज झालं आहे. त्यानुसार, पश्चिम रेल्वेनं १० नवे स्वयंचलित पर्जन्यमापक (ARG) यंत्रणा बसवली आहे.

रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर राहणार ड्रोनची नजर
SHARES

दरवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. रुळांवर पाणी साचल्यानं रेल्वे प्रशासनाला लोकल रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहत नाही. मात्र, आता रेल्वे प्रशासन मान्सूनसाठी सज्ज झालं आहे. त्यानुसार, पश्चिम रेल्वेनं १० नवे स्वयंचलित पर्जन्यमापक (ARG) यंत्रणा बसवली आहे. पश्चिम रेल्वेनं मुंबईच्या उपनगरीय परिसरात ही यंत्रणा बसविली असून, आणखी ४ स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसविणार असल्याची माहित समोर येत आहे. शिवाय, ही स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा पश्चिम रेल्वेला पावसाची योग्यती माहिती देणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते विरार स्थानकादरम्यान पावसात जास्तीचा पाऊस झाल्यास चांगलंच पाणी तुंबतं. रेल्वे रुळ पाण्याखाली जातात. त्यामुळं आता या मार्गावरी ड्रोननं नजर ठेवली जाणार आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वेला लोकल वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल.

मध्य रेल्वेनं ही आपल्या मार्गावरील इगतपूरी आणि लोणावळा स्थानकात स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसविली आहे. तसंच, ज्या भागांत पावसाचं पाणी साचून रेल्वे रुळ पाण्याखाली जातात, अशा परिसरात ड्रोननं नजर ठेवली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणाही रेल्वे प्रशासनाला पावसाची माहिती पुरवणार असून, रेल्वे मार्गावरील ज्या भागांत अधिक पाऊस होऊन रेल्वे रुळांवर पाणी साचत असल्यास याबाबत पूर्वमाहिती देणार आहे. स्वयंचलित पर्जन्यमापक ही यंत्रणा मानवी हस्तक्षेपाशिवाय, ऑनलाईन आणि रिअल-टाइम आधारावर पावसाच्या मोजमापांचे परीक्षण करणार आहे. तसंच, संबंधित परिसरातील सर्व माहिती थेट नियंत्रण कक्षाला प्रसारित करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी दिली.



हेही वाचा -

यंदा मान्सूनचा सामना करण्यासाठी रेल्वे सज्ज

बनावट ओळखपत्रावर रेल्वेनं प्रवास करण्यास मनाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा