Advertisement

मुंबईच्या आकाशात लखलखणार दुर्मिळ शलाका


मुंबईच्या आकाशात लखलखणार दुर्मिळ शलाका
SHARES

येत्या दोन दिवसांत मुंबईकरांना आकाशात लखलखणारी दुर्मिळ प्रकाश शलाका अर्थात 'फ्लेयर' बघण्याची संधी मिळणार आहे. हे फ्लेयर म्हणजे उल्कांसारखी क्षणिक दिसणारी प्रकाश रेषा किंवा शलाका असते. तिच्या दिसण्याचा काळ अवघ्या सेकंदभराचा इतका कमी असतो. मुंबईच्या आकाशात दिसणारी शलाका इरीडियम नावाच्या सॅटेलाईटमुळे तयारी होणारी असेल. 

6 मे ला चंद्राच्या जवळ सायंकाळी 7 वाजून 49 मिनिटे 59 सेकंदांनी ही प्रकाश शलाका दिसेल. दुसऱ्यादिवशी 7 मे ला सायंकाळी 7 वाजून 43 मिनिटे 55 सेकंदाला पुन्हा ती दिसेल. मात्र ही प्रकाश शलाका 6 मे तुलनेत जवळजवळ 40 पटींनी प्रखर असेल.
या घटना दुर्मिळ नसून त्या वरचेवर दिसतात. तरीही यंदाच्या दोन घटनांचे वैशिट्य असे की, या दोन्ही घटना यावेळेस चंद्राच्या जवळ दिसणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना देखील कुठल्याही दुर्बिणीशिवाय या शलाका सहज बघता येतील.

अशी दिसेल शलाका
इरीडियम कृत्रिम उपग्रहांवर लावलेल्या सोलार पॅनेलवरून सूर्याचा प्रकाश परावर्तीत होणार असल्याने ही शलाका दिसणार आहे. ज्या प्रकारे एखाद्या आरशाचा कवडसा पाडतो, तसाच हा प्रकार असणार आहे. फक्त एवढेच की सॅटेलाईट अत्यंत वेगाने पृथ्वीची परिक्रमा करत असल्याने हा कवडसा आपल्या डोळ्यांसमोरून क्षणाधार्थ निघून जाईल. त्यामुळे ज्यांना ही शलका बघायची असेल, त्यांनी या वेळेच्या सुमारे 10 मिनिटे अगोदर अशा ठिकाणी जावे की तेथून चंद्र अगदी स्पष्टपणे दिसू शकेल. सुमारे 7.40 वा. चंद्र क्षितीजाच्या बराच वर आलेला असेल. तुम्हाला या दुर्मिळ शलाकेचे चित्रीकरण करायचे असेल तर चंद्राच्या दिशेने तुमचा कॅमेरा स्थिर करून शलाकेच्या वेळेच्या 30 सेकंद आधीपासून सुरु करून ठेवावा. या शलाकेसोबत तुम्हाला चंद्राच्या जवळ गुरू देखील दिसेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा