Advertisement

'मॅकडोनाल्ड'च्या पदार्थांमधून 'चीज' गायब!

FDA च्या कारवाईनंतर नाव बदलते

'मॅकडोनाल्ड'च्या पदार्थांमधून 'चीज' गायब!
SHARES

अनेक खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या 'मॅकडोनाल्ड' या साखळी रेस्तराँवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून (FDA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे 'मॅकडोनाल्ड'च्या मेन्यूमधून 'चीज'  गायब होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे आता 'मॅकडोनाल्ड'कडून त्यांच्या मेन्यूतून चीज हा शब्द हटवण्यात आला आहे. 

अहमदनगर येथील ‘मॅकडोनॉल्ड’ येथील रेस्तराँमध्ये मिळणाऱ्या विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न व सुरक्षा आयुक्तांनी नेमलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी संबंधित ‘मॅकडोनॉल्ड’ आऊटलेटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

मात्र, संबंधित आऊटलेटने या नोटीसकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राजेश बढे आणि डॉ. बी. डी. मोरे या अधिकाऱ्यांनी अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले जात नसल्यामुळे अखेरीस या पदार्थांची विक्री थांबविण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ‘मॅकडोनॉल्ड’ ही रेस्तराँची साखळी चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्तराँ प्रा. लि. या कंपनीने अखेरीस आपण पदार्थांची नावे बदलल्याचे पत्र या अधिकाऱ्यांना दिले आहे.

'मॅकडोनाल्ड' रेस्तराँमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमध्ये चीज नव्हे तर चीजसदृश पदार्थ वापरला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब कंपनीनेही मान्य करत पदार्थांच्या नावांमधून 'चीज' हा शब्द हटवला आहे. हा आदेश अहमदनगरपुरता मर्यादीत असला तरी ते राज्यातील ‘मॅकडोनॉल्ड’च्या सर्वच रेस्तराँना लागू असेल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले.

ज्या खाद्यपदार्थांच्या नावात चीजचा उल्लेख होता, तो हटवण्यात आला आहे. त्यामुळे आता 'मॅकडोनाल्ड'च्या खाद्यपदार्थांची नावे पुढीलप्रमाणे असतील.

वेज नगेटस (चीजी नगेटस)

चेड्डार डिलाईट वेज – नॉनवेज बर्गर (मॅक चीज वेज – नॉनवेज बर्गर)

अमेरिकन वेज बर्गर (कॉर्न  चीज बर्गर)

अमेरिकन नॉन-वेज बर्गर (ग्रील्ड चिकन अ‍ॅण्ड चीज बर्गर)

ब्ल्यु बेरी केक (ब्ल्यु बेरी चीज केक)

इटालियन वेज- नॉन वेज बर्गर (चीजी इटालियन वेज- नॉन वेज बर्गर) 



हेही वाचा

महाराष्ट्रात लवकरच, 5 जिल्ह्यांमध्ये 85 चक्रीवादळ निवारे बांधण्यात येणार

टाटा रुग्णालय आणखी 5 केंद्रांमध्ये उपचार सुविधा सुरू करणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा