Advertisement

मुंबई, उपनगरातील कमाल व किमान तापमानात सतत बदल

मुंबई आणि उपनगरातील कमाल आणि किमान तापमानात मागील काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत.

मुंबई, उपनगरातील कमाल व किमान तापमानात सतत बदल
SHARES

मुंबई आणि उपनगरातील कमाल आणि किमान तापमानात मागील काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत. उपनगरातील कमाल आणि किमान तापमानात ३ ते ५ अंशांची घट आणि वाढ सतत होत आहे. रविवारी उपनगरातील किमान तापमानात एकाच दिवसात ५ अंशांची वाढ झाली आणि सोमवारी पुन्हा त्यामध्ये ४ अंशांची घट नोंदविण्यात आली.

मंगळवारी सांताक्रूझ केंद्रावर  कमाल तापमान  ३६ अंशांपेक्षा अधिक नोंदविण्यात आले. गुरुवापर्यंत त्यामध्ये पाच अंशांची घट झाली. मात्र, शनिवारी पुन्हा त्यात ३ अंशाची वाढ झाली. सोमवारी त्यामध्ये किरकोळ बदल नोंदविण्यात आला. तर, गुरुवापर्यंत १९ अंश असलेल्या किमान तापमानात शनिवारी ३ अंशाची घट झाली. रविवारी त्यामध्ये एकाच दिवसात तब्बल ५ अंशाची वाढ होऊन ते २२ अंशावर पोहचलं. सोमवारी त्यामध्ये पुन्हा ४ अंशाची घट झाली. तुलनेनं कुलाबा केंद्रावरील तापमानातील बदल २ ते ३ अंशापर्यंत होत आहेत.

सोमवारी दोन्ही केंद्रावरील कमाल तापमान ३० अंशापेक्षा अधिक नोंदलं गेलं. कुलाबा केंद्रावर २१.२ अंश, सांताक्रूझ केंद्रावर १८ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले, तर ३३.८ अंश आणि ३४.५ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. पुढील काही दिवसांत तापमान वाढ होण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा