Advertisement

मराठा आरक्षणाविरोधात मुंबईत छगन भुजबळांचा मोर्चा

राज्यभरातील अनेक ओबीसी नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने केली जात असून हा शासन निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मराठा आरक्षणाविरोधात मुंबईत छगन भुजबळांचा मोर्चा
SHARES

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता आहे.

राज्यभरातील (maharashtra) अनेक ओबीसी नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने केली जात असून हा शासन निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. सत्ताधारी महायुतीतील नेते आणि राज्य सरकारमधील मंत्रीही याला अपवाद नाहीत.

मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरवरून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सरकारविरोधात दंड थोपटले असून हा जीआर ओबीसींवर (OBC) अन्याय करणारा असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता ओबीसी नेत्यांकडून आंदोलनासाठी मोर्चेबांधणी केली जात असून ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकण्याची शक्यता आहे.

सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे (GR) मराठा समाजातील (Maratha Reservation) अनेक व्यक्तींना कुणबी दाखले मिळून त्यांचे ओबीसीकरण होण्याची भीती ओबीसीतील इतर जातींना आहे.

या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी आपला रोष व्यक्त करण्यासाठी आम्हीही मुंबईत (mumbai) लाखोंच्या संख्येने धडक देऊ, असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे. साधारण 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसी मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी लाखो आंदोलकांसह मुंबईत (mumbai) उपोषण करत सरकारला झुकण्यास भाग पाडलं आणि आपल्या मागण्या मान्य केल्या.

मात्र या शासन निर्णयामुळे अस्वस्थ झाल्यामुळे ओबीसींकडूनही मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

आरबीआयकडून मुंबईत 4.61 एकर जमीन खरेदी केली

मुंबईत बॉम्बच्या धमकीमुळे पोलिस हाय अलर्टवर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा