Advertisement

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकला संग्रहालय उभारण्यात येणार

सोमवारी पर्यटन विभागाने नव्या निर्णयाची घोषणा केली आहे.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकला संग्रहालय उभारण्यात येणार
SHARES

मुंबईतील गोराई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकला संग्रहालय उभारण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला आहे. येथील १३६ एकर जागेवर हे संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका वृत्तपत्राला दिली.

शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेल्या ५० कोटी रुपयांतून संग्रहालयासाठी निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

सोमवारी पर्यटन विभागाने नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. यासाठी लोढा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत संग्रहालयाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला.

त्याचे काम लवकरच सुरू करण्याचा पर्यटन विभागाचा मानस असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित ही उभारणी होणार आहे.

एमटीडीसीच्या जागेवर हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. जवळपास १३६ एकर जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संग्रहालयात शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांची, प्रामुख्याने सागरी किल्ल्यांची प्रतिकृती आणि इतर माहिती पाहता येईल.

त्याशिवाय गनिमी कावा असो किंवा इतर युद्धनीती या सर्वांची माहिती याठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. याबरोबरच शिवाजी महाराजांच्या विविध लढायांची माहितीही संग्रहालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या संग्रहालयाची अंतिम रूपरेषा निश्चित झाली असून लवकरच काम सुरू करण्यात येईल. 



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा