Advertisement

‘प्लास्टिक बंदी’ प्रदर्शन कार्यक्रमात मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं टाळलं


‘प्लास्टिक बंदी’ प्रदर्शन कार्यक्रमात मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं टाळलं
SHARES

मुंबईत प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिकेच्यावतीनं जनजागृतीचा भाग म्हणून प्लास्टिकला पर्याय काय याबाबत याबाबत तीन दिवसांचे प्रदर्शन शुक्रवारी २२ जूनपासून भरवण्यात येत आहे. परंतू या प्रदर्शन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मात्र नकार दर्शवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडवणीस आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्यानंतर या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर येणार होते. परंतू दोघांनीही नकार देत एकत्र येणं टाळलं.


मान्यवर उपस्थित

वरळी येथील 'नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया'च्या (एनएससीआय) प्रेक्षागारात शुक्रवारी २२ ते रविवार २४ जून दरम्यान या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, चित्रपट अभिनेता अजय देवगण, चित्रपट अभिनेत्री काजोल, अमृता फडणवीस, शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नवीन चर्चांना पूर्णविराम

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून भाजपावर अप्रत्यक्ष टिका करून स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर उध्दव ठाकरे यांची बंद दाराआडही चर्चा झाली. मात्र, त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली गेली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावर आल्यास प्रसारमाध्यमांचा मोठा विषय होईल यासाठीच  मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं टाळून नवीन चर्चांना पूर्णविराम दिला.



हेही वाचा -

विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

एलबीएस रोडचा पालिका करणार पुन्हा विस्तार


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा