आठपैकी सात प्रभाग समित्या बिनविरोध

 Mumbai
आठपैकी सात प्रभाग समित्या बिनविरोध

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले असून यापैकी सात प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सातपैकी तीन प्रभागांमध्ये शिवसेनेचे तर चार प्रभागांमध्ये भाजपाच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड होईल. तर कुर्ल्यातील ‘एल’ प्रभागात शिवसेनेच्या प्रविणा मोरजकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान यांच्यामध्ये लढत आहे.

महापालिकेच्या ‘एच/पूर्व,एच/पश्चिम’प्रभाग समितीत शिवसेनेचे संजय अगलदरे, ‘के/पूर्व’प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपाच्या वतीने उज्ज्वला मोडक, ‘के/पश्चिम’प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपाचे योगीराज दाभाडकर, ‘एम/पश्चिम’प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपाच्या सुषम सावंत, ‘एन’प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे तुकाराम पाटील आणि ‘एस व टी’प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपाच्या समिता कांबळे आदींनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. परंतु या सातही प्रभागामध्ये विरोधी पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरले न गेल्यामुळे यासर्वांची निवड बिनविरोध होणार आहे. निवडणुकीची औपचारिकाता पूर्ण झाल्यावर यासर्वांची अध्यक्षपदासाठी निवड जाहीर केली जाणार आहे.

Loading Comments