'त्या' बाळाचा अखेर मृत्यू

  Mumbai
  'त्या' बाळाचा अखेर मृत्यू
  मुंबई  -  

  रत्नागिरीतून दादरला येणाऱ्या धावत्या रेल्वेतील शौचालयातून पडून बचावलेल्या नवजात बालकाचा आणि त्याच्या आईचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. रत्नागिरीहून दादरला येणाऱ्या धावत्या ट्रेनमधील शौचालयात रविवारी एका महिलेची प्रसुती झाली. त्यावेळी हे बाळ ट्रेनच्या टॉयलेटमधून खाली पडूनही सुखरुप वाचले होते. मात्र सोमवारी नवी मुंबईतील रुग्णालयात या नवजात बाळाचा, तर मंगळवारी रात्री बाळाची आई चंदना शाह हिचे यकृत निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला.

  चंदना शाह ही मूळची पश्चिम बंगालची आहे. रत्नागिरीहून दादरला येताना तिने चालत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिला. मात्र कुसा स्टेशनजवळ चालत्या रेल्वेच्या शौचालयातून हे बाळ थेट रेल्वे ट्रॅकवर पडले. यानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली आणि बाळाला ट्रॅकवरून उचलण्यात आले. विशेष बाब म्हणजे त्यावेळी हे बाळ जिवंत होते. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर कुसा गावचे रहिवासी, रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने बाळाला आणि आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्देवाने आई आणि बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.