Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या धावपट्टीचा प्रस्ताव

CIDCO कडून व्यवहार्यता अभ्यास सुरू

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या धावपट्टीचा प्रस्ताव
SHARES

मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई प्रवासी वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन CIDCO ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. यासाठी RITES Limited आणि Creative Group LLP यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक व व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास (techno-commercial feasibility study) करण्यात येणार आहे.

या संदर्भात 15 एप्रिल 2026 रोजी CIDCO चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत CIDCO, RITES आणि क्रिएटिव्ह ग्रुप LLP चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अभ्यासाचा अहवाल सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा Chhatrapati Shivaji Maharaj International Airport सोबत मुंबई परिसरातील दुसरा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. हा देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर दरवर्षी सुमारे 9 कोटी प्रवासी आणि 3.2 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता असणार आहे.

सुमारे 1,160 हेक्टर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या विमानतळात टप्प्याटप्प्याने दोन समांतर धावपट्ट्या आणि चार टर्मिनल्स विकसित करण्यात येणार आहेत. मात्र, भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता तिसऱ्या धावपट्टीचा पर्याय तपासला जात आहे.

हा व्यवहार्यता अभ्यास तांत्रिक, ऑपरेशनल, पर्यावरणीय आणि आर्थिक बाबींचा सखोल आढावा घेऊन तिसरी धावपट्टी उभारणे शक्य आहे का? याचा निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या विस्तारामुळे विमानतळाची क्षमता वाढून NMIA ला एक प्रमुख एव्हिएशन हब म्हणून बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.


हेही वाचा

वर्षभरातच परळ स्थानकाचा भाग तोडण्यास सुरुवात

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा