ग्रँड हयात हॉटेल विरोधत मोर्चा

 Santacruz
ग्रँड हयात हॉटेल विरोधत मोर्चा
ग्रँड हयात हॉटेल विरोधत मोर्चा
ग्रँड हयात हॉटेल विरोधत मोर्चा
ग्रँड हयात हॉटेल विरोधत मोर्चा
ग्रँड हयात हॉटेल विरोधत मोर्चा
See all

कलिना - नगरेसवक ब्रायन फ्रांसिस यांच्यासह कलिनातील रहिवाशांनी रविवारी ग्रँड हयात  हॉटेलसमोर मोर्चा काढला. ग्रँड हयात हॉटेल जवळील काही जागा नागरिकांसाठी उद्यान बनवण्यात यावे म्हणून राखीव ठेवण्यात आलीय. पण त्या जागेवर हॉटेल कब्जा करू पाहात आहे. किंबहुना पालिकेकडून कोणतेही ना हरकत प्रमाण पात्र न घेता दोन मजले वाढवले आहेत.

या सर्व गैरकारभाराबाबत 2013 पासून कलिनाचे नगरसेवक ब्रायन फ्रांसिस हे आवाज उठवत आहेत. पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येनं रहिवाशांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर दोन दिवसांत पालिकेकडून अर्ज मंजूर करून ती जागा पालिकेच्या स्वाधीन करू असं आश्वासनही या वेळी देण्यात आलं.

Loading Comments