Advertisement

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा दीड महिना उशिरा


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा दीड महिना उशिरा
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेचा 2017-18 चा अर्थसंकल्प यंदा दीड महिने उशिरा सादर केला जाणार आहे. दरवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प हा 5 फेब्रुवारीपर्यंत सादर करणे आवश्यक असते. परंतु यंदा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे हा अर्थसंकल्प 5 फेब्रुवारीला न मांडता 20 मार्चपर्यंत मांडला जाणार आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मांडला जातो. महापालिका आयुक्त हे अर्थसंकल्प तयार करून स्थायी समिती अध्यक्ष यांना सादर करतात. यामुळे वर्षभरातील विकासकामे, नव्या योजना, कर आणि दरवाढ तसेच इतर नागरी पायाभूत सेवा सुविधांचा समावेश असतो. परंतु यंदा निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे हा अर्थसंकल्प निवडणूक निकालानंतर सादर केला जाणार आहे.
या पूर्वीचा अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीत सादर केला होता. परंतु तो जाहीर न करता तो तिजोरीत ठेवण्यात आला होता आणि सहा महिन्यांकरता नवीन अर्थसंकल्प बनवण्यात आला होता. मात्र, यंदा हा अर्थसंकल्प 20 मार्चपर्यँत मांडला जाण्याची शक्यता आहे. महापालिका लेखापाल (वित्त) हरिभाऊ निकम यांनी याबाबत स्पष्ट करताना असे सांगितले की, सध्याच्या अर्थसंकल्पाला 31 मार्चपर्यंत मंजुरी आहे. त्यामुळे नवीन महापालिका अस्तित्वात आल्यानंतर हा अर्थसंकल्प मांडला जाईल. महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीला सादर करण्यात आल्यानंतर तो खर्च करण्याची तरतूद आहे. त्यामुळे 20 मार्चपर्यंत सादर करून 31 मार्चपूर्वी त्याला मंजुरी दिली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा