Advertisement

महापालिकेची लिपिक भरती लांबणीवर

आस्थापना खर्चात होत असलेली वाढ आणि महापालिकेच्या उत्पन्नात झालेली घट झाल्यामुळं कार्यकारी सहायक पदाच्या अर्थात, लिपिकपदासाठी सरळसेवा पदांमधून होणाऱ्या ८१० पदांची भरती लांबणीवर पडली आहे.

महापालिकेची लिपिक भरती लांबणीवर
SHARES

महापालिकेच्या (BMC) नोकर भरतीच्या इच्छुकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आस्थापना खर्चात होत असलेली वाढ आणि महापालिकेच्या उत्पन्नात झालेली घट (Decrease in municipal income) झाल्यामुळं कार्यकारी सहायक पदाच्या अर्थात, लिपिकपदासाठी (Executive Assistant Post) सरळसेवा पदांमधून होणाऱ्या ८१० पदांची भरती लांबणीवर पडली आहे. या भरतीसह महापालिका कर्मचाऱ्यांमधून (BMC Workers) होणाऱ्या ८७४ जागांसाठीची अंतर्गत भरतीही रखडली आहे. 

महापालिकेत कार्यकारी सहायक वर्गातील ५ हजार २५५ पदे असून, त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीनं ३ हजार २२१ पदे भरायची आहेत. यामधील ८१० पदे सरळसेवा भरतीतून भरण्यात येणार आहेत. तसंच, कर्मचाऱ्यांमधून अर्थात अंतर्गत भरतीतून ८७४ पदे भरण्यात येणार होती. त्यासाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट (Maharicruitment) या वेबसाइटवर अपलोड केला जाऊन त्याची लिंक महापालिकेच्या वेबसाइटवर (BMC Website) उपलब्ध करून दिली जाणार होती.

भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या (Standing Committee) मागील बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. पण, त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही. गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावाला (Proposal) मंजुरी मिळणे अपेक्षित होते. पण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल (Additional Commissioner Vijay Singhal) यांनी एका निवेदनाद्वारे प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली.

महापालिकेच्या उत्पन्नात (Income) झालेली घट व आस्थापना खर्चात (Establishment costs) झालेली वाढ यामुळं नोकर भरतीचा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र, याला विरोधी पक्षनेते रवी राजा (Opposition Leader Ravi Raja) यांनी आक्षेप घेतला. 'सल्लागारांवर कोट्यवधी रुपये उडवणारी महापालिका (BMC) प्रशासन नोकर भरतीला विरोध का करत आहे? लिपिकांची कमतरता लक्षात घेता भरती झालीच पाहिजे', असा आग्रह त्यांनी धरला.

या प्रकरणी स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीतील सदस्यांच्या सूचना आणि आक्षेप विचारात घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भरती रद्द करण्याचे निवेदन रोखलं. याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.



हेही वाचा -

न्यूझीलंडच्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती, प्रतिस्पर्धी फलंदाजाला खाद्यावर उचलले

आजपासून ३ दिवस सरकारी बँका बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा