Advertisement

'मुंबईतील बेकायदेशीर पशु-पक्ष्यांची विक्री बंद करा'


'मुंबईतील बेकायदेशीर पशु-पक्ष्यांची विक्री बंद करा'
SHARES

संपूर्ण मुंबईतील बेकायदेशीर पशु-पक्ष्यांची विक्री बंद करा, असा आदेश गुरुवारी हायकोर्टाने दिला आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील बेकायदेशीर आणि पाळीव प्राण्यांची दुकाने बंद करावीत, याबाबत फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी जनहित याचिका अॅड. संजुक्ता डे आणि अॅड. अभिषेक येंदे यांनी दाखल केली होती. याच याचिकेवरून क्रॉफर्ड मार्केटसह संपूर्ण मुंबईतील सर्व अवैध पशु-पक्ष्यांची विक्री दुकानं बंद करण्याचा अंतिम आदेश हायकोर्टाने दिला.

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या प्राणी आणि पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं याआधी दिले होते. मात्र तरीही बंद दुकानांच्यासमोर उभं राहून धंदा सुरू असल्याचा अहवाल यासंदर्भात बनवलेल्या समितीनं कोर्टासमोर मांडला.

हे आदेश देताना हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं की, ही दुकानं पुन्हा सुरू होणार नाहीत, याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलीसांनी काळजी घ्यावी. मात्र तरीही बेकायदेशीरपणे पाळीव पशु-पक्ष्यांची विक्री सुरू असल्याची माहीती फोटोसह कोर्टासमोर आली.

याचिकाकर्त्यांच्या मते इथं ठेवण्यात आलेल्या पशु-पक्ष्यांवर अनन्वित अत्याचार केले जातात. त्यांना अतिशय बंदीस्त जागेत छोट्या छोट्या पिंजऱ्यात बंद करून ठेवलं जातं. कुत्र्यांची आणि मांजरांची पिल्लं डोळे उघडायच्या आतच त्यांच्या आईपासून हिरावून इथं विक्रीसाठी आणून ठेवली जातात. अनेकदा या प्राण्यांना गुंगीची औषधं देऊन झोपवलं जातं. यासर्व बाबी लक्षात घेऊन हायकोर्टानं पाळीव पशु-पक्ष्यांचा हा बेकायदेशीर बाजार कायमचा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा