'ढक्कन' गुल

 Govandi
'ढक्कन' गुल
'ढक्कन' गुल
See all

गोवंडी - पालिकेच्या एम पूर्व कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या गटारावरील नाल्याचे झाकण गायब आहे. पशुवध गृहाला लागून असलेल्या गटारांवर तर अनेक महिन्यापासून पालिकेने झाकणे लावली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी अब्दुल शेख यांनी केला आहे. पशुवध गृह ते देवनार पोलीस ठाणे या पदपथावर नेहमीच विद्यार्थी आणि पादचाऱ्यांची ये-जा असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय पालिका कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना पालिका अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का असा सवालही शेख यांनी उपस्थित केला आहे.

Loading Comments