१ एप्रिलपासून नॅचरल गॅसची किंमत वाढणार ?

१ एप्रिलपासून घराचं बजेट कोलमडण्याची शक्यता असून घरघुती नैसर्गिक गॅसची किंमत १८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकार लवकरच याबाबच निर्णय घेईल, असं म्हटलं जात आहे.

SHARE

१ एप्रिलपासून घराचं बजेट कोलमडण्याची शक्यता असून स्वयंपाकाच्या गॅसची किंमत १८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकार लवकरच याबाबच निर्णय घेईल, असं म्हटलं जात आहे.


सीएनजीही वाढणार

१ एप्रिलपासून नैसर्गिक गॅसचे दर वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर गाड्यांमध्ये वापरण्यात येणारा सीएनजी आणि घरगुती जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या पीएनजी गॅसची किंमत १८ टक्क्यांनी वाढणार आहे. रेटिंग एजन्सी केअर रिपोर्टमध्ये ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच नव्या घरगुती गॅस धोरण २०१४ नुसार दर ६ महिन्यांनी नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवण्यात येतात.


बाजारातील किंमतीवर दर

हा दर परदेशी बाजारातल्या किमतीवर आधारित असतो. सीएनजी,पीएनजी गॅसचे दर वाढल्यास मॅन्युफॅक्चरिंग, ट्रॅव्हल आणि एनर्जी सेक्टरमध्ये महागाई वाढण्याची शक्यता रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिका, रशिया आणि कॅनडा हे गॅसवितरक देश असून यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसारच भारतातील नैसर्गिक गॅसची किंमत ठरत असते. तसंच एप्रिल महिन्यात नैसर्गिक गॅसची किंमत ३.३६ डॉलर्सवरून वाढून ३.९७ डॉलर्सवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतीय कंपन्यांवर होणार असून भारतातदेखील पीएनजी, सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा - 

हिमालय ब्रिज दुर्घटनेनंतर वाहतूक मार्गात बदल

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला जागा देण्याचा निर्णय योग्यच, राज्य सरकारचं न्यायालयात स्पष्टीकरण
संबंधित विषय
ताज्या बातम्या