मालाड ते भाईंदर दरम्यान सीएनजीचे पंप बंद

  मुंबई  -  

  मालाड - मेट्रोचं काम सुरु असल्यामुळे मालाड पूर्व परिसरात बुधवारी महानगर गॅसची पाईपलाईन फुटली होती. त्यामुळे कंपनीनं या भागातला गॅसपुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. मात्र कालच्या घटनेमुळे याचा फटका आज सीएनजी गॅसवर चालणाऱ्या रिक्षा आणि कारचालकांना बसला आहे.

  महानगरने गॅसपुरवठा बंद केल्यामुळे गुरूवारी मालाड ते भाईंदरपर्यंतच्या रस्त्यावरचे सर्व गॅस पंप बंद आहेत. या परिसरात एकूण 18 गॅस पंप असून त्यापैकी एकाही गॅस स्टेशनवर गॅस उपलब्ध न झाल्यामुळे वाहन चालकांकडून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बुधवारी दुपारपासूनच हे स्टेशन्स बंद असून कधीपर्यंत काम चालेल याबाबतही पंपचालकांकडून काहीही सांगण्यात येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.