Advertisement

प्रवासी विमानतळावर विसरले १० कोटींच्या वस्तू

अनेक विसरभोळे प्रवाशी कोट्यवधी रुपयांचं आपलं किमती सामान विमानतळावर विसरल्याचं समोर आलं आहे.

प्रवासी विमानतळावर विसरले १० कोटींच्या वस्तू
SHARES

अनेक विसरभोळे प्रवाशी कोट्यवधी रुपयांचं आपलं किमती सामान विमानतळावर विसरल्याचं समोर आलं आहे. ह्या सामानाची किंमत तब्बल १० कोटी ८ लाख रुपये आहे. यातलं काही सामान प्रवाशांना परत करण्यात आलं आहे. मात्र, बऱ्याच वस्तूंचे मालक अद्याप समोर आलेले नसल्याने हे सामान  एअरपोर्ट आॅपरेटरकडे सोपविण्यात आलं आहे. 

जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० कोटी ८ लाख १७ हजार ७८ रुपये किमतीच्या वस्तू प्रवाशी विसरले आहेत. यातील तर २ कोटी ९६ लाख १४ हजार ११० रुपये किमतीच्या वस्तू संबंधित प्रवाशांना परत देण्यात आल्याची माहिती सीआयएसएफतर्फे देण्यात आली.  ७ कोटी १२ लाख २ हजार ९६८ रुपये किमतीच्या वस्तूंचे मालक मात्र समोर आलेले नाहीत. विमानतळावरील हरवले-सापडले या विभागात त्या वस्तू ठेवल्या आहेत. 

 प्रवाशांना लॅपटॉप, पर्स, मोबाइलचा सर्वाधिक विसर पडत असल्याचं दिसून आलं आहे. ९ महिन्यात ३५ हजार ८१३ वस्तू प्रवासी विसरले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या साहाय्याने ५,४०५ प्रवाशांना त्यांच्या विसरलेल्या वस्तू केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) परत करण्यात आल्या आहेत.हेही वाचा -

आगीच्या अफवेमुळे लोकलमधून तरुणीची उडी

राणीच्या बागेत बिबट्या, तरसाची जोडी होणार दाखल
संबंधित विषय
Advertisement