Advertisement

आगीच्या अफवेमुळे लोकलमधून तरुणीची उडी

लोकल माटुंगा स्थानकातून निघत असतानाच अचानक मोठा आवाज झाला. डब्यातून जळाल्याचा वास आला. त्यामुळे डब्यातील सर्व प्रवाशी घाबरले.

आगीच्या अफवेमुळे लोकलमधून तरुणीची उडी
SHARES

धावत्या लोकलमध्ये पसरलेल्या अफवांना घाबरून एका तरूणीने चक्क लोकलमधून उडी मारली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. तरूणीच्या हनुवटीला जखम झाली असून तिच्यावर अफवांथील पांचोली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 अनिशा खेमाने (२०) हिने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कल्याणला जाणारी लोकल पकडली. लोकल माटुंगा स्थानकातून निघत असतानाच अचानक मोठा आवाज झाला. डब्यातून जळाल्याचा वास आला. त्यामुळे डब्यातील सर्व प्रवाशी घाबरले.  धावा... पळा... लोकलमधून धूर येतोय... लोकलला आग लागली असा आरडाओरडा प्रवाशांनी सुरू केला. नक्की काय होतेय हे समजत नसल्याने गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या अनिशाने फलाटावर उडी मारली. यामध्ये अनिशाला गंभीर दुखापत झाली नसली तरी तिच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. तिच्या हनुवटीवर सात टाके घालावे लागले आहेत.

माटुंगा स्थानकात लोकल पोहचल्यानंतर लोकलमधील एअर ब्रेकचा मोठा आवाज झाला. त्यामुळे हवा बाहेर फेकली गेली. या हवेमुळे फलाटावरील धुरळा उडाला. एअर ब्रेकचा आवाज आणि फलाटावरील धूळ पाहून डब्यातील प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला, अशी माहिती आता समोर येत आहे. हेही वाचा -

राणीच्या बागेत बिबट्या, तरसाची जोडी होणार दाखल

मुंबईतील मॉलच्या वाहनतळांकडे वाहनचालकांची पाठ
संबंधित विषय